पनीर बटर मसाला

paneer-butter-masala-recipe-marathi

paneer-butter-masala-recipe-marathi

पनीर बटर मसाला

साहित्य:

पनीर पाव किलो

कांदे दोन

खसखस दोन चमचे

टोमॅटो दोन

आलं लसूण वाटण दोन चमचे

बटर तीन चमचे

दूध अर्धा कप

क्रीम दोन चमचे

सुकं खोबरं किसून एक चमचा

दालचिनी एक तुकडा

लवंगा दोन

वेलची दोन

तमालपत्र एक

तिखट एक चमचा

हळद पाव चमचा

धनेपूड-जिरंपूड प्रत्येकी अर्धा चमचा

गरम मसाला एक चमचा

मीठ

कृती :

सुकं खोबरं लवंग, वेलची, दालचिनी व खसखस लाल होईपर्यंत भाजून घ्यावं.

खोबर-खसखस, लवंग, वेलची, दालचिनी मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घ्यावं.

कांदा-टोमॅटोची प्युरी वेगवेगळी करून ठेवावी.

चमचाभर बटर गरम करून त्यात तमालपत्र, कांद्याची प्युरी घालून परतावी.

आलं-लसूण वाटण घालून लाल होईपर्यंत परतावं. त्यावर तिखट, हळद, गरम मसाला, धनेपूड, मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

टोमॅटो प्युरी घालून पाच-दहा मिनिटं परताव. त्यावर दूध, क्रीम घालून मंद आचेवर ग्रेव्ही शिजू द्यावी.

आवश्यकता असेल तरच ग्रेव्हीत पाणी घालावं.

त्यात पनीरचे तुकडे, राहिलेलं दोन चमचे बटर, गरम मसाला घालुन पंधरा मिनिटं परत वाफ येऊ द्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.