
पनीर भुर्जी
साहित्य :
पनीर पाव किलो
कांदे दोन मोठे
टोमॅटो दोन मध्यम आकाराचे
तिखट अर्धा चमचा
धने पूड पाव चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
तेल सहा चमचे
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
जिरे एक चमचा
हिंग चिमूटभर
मीठ
कृती :
कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.
पनीर किसून घ्यावं. तेल गरम करून त्यात हिंग, जिरे घालावं.
कांदा घालून तांबूस लाल होईपर्यंत परतावा.
मग टोमॅटो घालून परतावं. टोमॅटो शिजून मऊ झाल्यावर तिखट, धनेपूड घालून मग पनीर व मीठ घालावं.
दोन-तीन मिनिटं हलवावं. कोथिंबीर व गरम मसाला घालून उतरवावं.
Leave a Reply