
पालक पुलाव
साहित्य:
दोन वाट्या बासमती तांदूळ
बारीक चिरलेला पालक तीन वाट्या
एक वाटी मटारदाणे
एक मोठा चमचा हिरव्या मसाल्याचं वाटण
एक मोठा चमचा लिंबाचा रस
एक चमचा कच्चा मसाला
अर्धी वाटी उभा पातळ चिरलेला कांदा
तीन मोठा चमचा तूप
अर्धी वाटी काजू पाकळ्या
हळद
पुदिन्याची पानं
चवीनुसार मीठ
चार-पाच वाट्या उकळतं पाणी.
फोडणीसाठी
लवंग, मिरी, दालचिनी आणि तमालपत्र
कृती :
तांदूळ धुऊन निथळावे. पालक आणि हिरवा मसाला एकत्र वाटावा.
जाड बुडाच्या भांड्यात तूप तापवून काजू तळून घ्यावे आणि बाजूला ठेवावे.
उरलेल्या तुपात अख्खा गरम मसाला फोडणीला टाकून त्यावर कांदा परतावा.
तांदूळ, मटार परतून त्यावर पालकाचं वाटण आणि लिंबाचा रस घालून परतावं.
चिमूटभर हळद, कच्चा मसाला पूड आणि चवीनुसार मीठ घालून जरुरीनुसार उकळतं पाणी घालून पुलाव शिजवावा.
शेवटी स्वादासाठी चिरलेला पुदिना आणि तळलेले काजू घालून एक वाफ आणावी.
Leave a Reply