
नवरतन कोर्मा
साहित्य:
गाजर लहान चौकोनी तुकडे करून पाऊण वाटी
श्रावण घेवडा सात-आठ शेंगा लहान तुकडे करून
मटारचे दाणे अर्धी वाटी
मखाना अर्धी वाटी
पनीर शंभर ग्रॅम लहान चौकोनी तुकडे करून
दही एक वाटी
बेदाणे दहा-बारा
काजू दहा-बारा लहान तुकडे करून
कांदे दोन मोठे अगदी पातळ उभे चिरून
आलं-लसूण वाटण एक चमचा
टोमॅटो दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून
काश्मिरी तिखट एक चमचा
हळद अर्धा चमचा
गरम मसाला एक चमचा
क्रीम एक वाटी
तेल सहा चमचे
मीठ
कृती:
पॅनमध्ये थोड्या तेलावर पनीरचे तुकडे परतून घ्यावे. मखाणाहि परतून घ्या.
कढईत तेल तापवून त्यात कांदा तांबूस लाल परतावा.
त्यानंतर टोमॅटो, हळद, तिखट, वाटलेलं आलं-लसूण, गरम मसाला घालून सर्व मिसळून जरा शिजवावं.
मग दही घालून ढवळून पाच मिनिटं शिजवावं. मसाला दाट झाला की एक वाटी पाणी घालावं.
आणखी पाच मिनिटं शिजवावं व चांगलं दाट होऊ द्यावं.
गाजर श्रावणघेवडा, मटार दाणे, मखाणा, पनीर, बेदाणे, काजू आणि वाटी-दीड वाटी पाणी घालून भाज्या शिजवून घ्याव्या.
शिजत आल्यावर क्रीम, गरम मसाला घालावा.
२ मिनिटे शिजवून गॅस बंद करा.
Leave a Reply