
नागपुरी वडा भात
साहित्य :
वड्यांसाठी
एक वाटी हरभरा डाळ
अर्धी वाटी तूर डाळ
मूग, उडीद, मटकीची डाळ प्रत्येकी पाव वाटी
अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
थोडे धने-जिरं
सुक्या मिरच्या
लसूण
थोडी कोथिंबीर
कढीपत्ता
मीठ
तेल
भातासाठी
दोन वाट्या तांदळाचा मोकळा फडफडीत भात
तेल
फोडणीचं साहित्य
कृती:
सगळ्या डाळी पाच-सहा तास भिजत घालून सर्व पाणी काढून घेऊन रवाळ वाटाव्या.
वाटताना त्यात धने, मिरच्या, जिरं आणि लसूण घालावा.
नंतर त्यात इतर साहित्य घालून त्या पिठाचे छोटे-छोटे वडे थापून गरम तेलात तळून काढावे.
मोकळ्या भातावर चार-पाच वडे कुस्करून घालावे आणि खायला देताना मोहरी, हिंग, हळद घालून तेलाची फोडणी भातावर घालावी.
या भाताबरोबर (साखर न घालता) ताकाची कढी करावी अतिशय रुचकर लागते.
Leave a Reply