
नाचणीचे पापड
साहित्य :
नाचणी
मीठ
पापडखार
हिंग
कृती :
नाचणी रात्री धुऊन, त्याची पुरचुंडी बांधून ठेवावी व दुसऱ्या दिवशी नाचणी चांगली सुकल्यावर दळावी.
नंतर ते पीठ फडक्यावर गाळून घ्यावे. एक किलो पिठाला तीस ग्रॅम पापडखार, पन्नास ग्रॅम हिंग व चवीप्रमाणे मीठ याप्रमाणे घेऊन ते जिन्नस पिठात मिसळावेत
जेवढे पीठ असेल, तेवढे पाणी घेऊन पिठाची ठकड करावी.
पीठ गरमच घेऊन तेलावर पापड लाटावे व ते वाळवावे.
Leave a Reply