
नान
साहित्य :
दीड वाटी मैदा
पाव वाटी सामान्य तापमानावरील आंबट दही
अर्धा लहान चमचा साखर
अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर
पाव लहान चमचा बेकिंग सोडा
एक मोठा चमचा तूप
एक मोठा चमचा कांद्याच्या बिया किंवा काळे जिरे
आवश्यकतेनुसार कोमट पाणी
मीठ चवीनुसार
कृती :
एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा एकत्र करा. मिश्रणाच्या मध्यभागी एक खळगा करा. नंतर त्यात मीठ, साखर, दही आणि तूप घालून नीट एकजीव करा.
हाताने किंवा लाकडी चमच्याने मिक्स करा.
त्याला थोड्या वेळासाठी तसेच राहू द्या.
नंतर थोडे थोडे कोमट पाणी घालत तुमच्या बोटांनी मिश्रणाला एकत्र करा. कणिकासारखे झाले की 5-6 मिनिटे त्याला मळा.
नरम कणिक बनवून त्यावर क्लिंग फिल्म लावून 4-5 तास बाजूला ठेवा.
जेव्हा हे बनविण्यासाठी तयार झाले की जर तुम्ही तंदूरमध्ये बनविणार असाल, तर तंदूर अगोदर गरम करून घ्या किंवा तवा गरम करा.
पीठाचे लहान लहान गोळे करा. पिठाला लहान प्लेटसारखे दाबा आणि त्यावर काळे जिरे शिंपडा.
पिठाला चपातीसारखे लाटा ज्यामुळे काळे जिरे त्यावर नीट चिकटतील.
आता नानच्या जिरे न लागलेल्या भागावर पेस्ट्री ब्रशने किंवा तुमच्या बोटांने थोडे पाणी लावा.
नंतर वरील बाजू तव्यावर घाला आणि मध्यम आचेवर नान भाजा. याला फुलेपर्यंत भाजा.
एक बाजू तव्यावर भाजली गेली की आचेवरून तवा काढून घ्या आणि नानच्या दुसऱ्या बाजूला सरळ आचेवर भाजा.
जर तुम्ही तंदूर वापरत असाल तर, नानला डोमच्या झाकणावर चिकटवा आणि फुलेपर्यंत राहू द्या.
नंतर झाकणावरून काढून घ्या आणि वायर रॅकवर ठेऊन दुसरी बाजू भाजा.
नान भाजले गेले की लगेच लोणी लावा आणि तुमच्या आवडीच्या भाजीबरोबर गरमगरम वाढा.
Leave a Reply