
मटण मसाला
साहित्य :
मटण एक किलो
तीन लिंबांचा रस
हिरव्या मिरच्या पाच
दही एक वाटी
चिरलेली कोथिंबीर दोन वाट्या
मीठ
जिरे एक चमचा
धनेपूड दोन चमचे
बटर अर्धी वाटी
कांदे दोन मोठे
आलं-लसूण वाटण तीन चमचे
कृती:
कोथिंबीर, मिरच्या, मीठ, धनेपूड, जिरं, दही, आलं-लसूण सर्व एकत्र करावं.
कांदे तुकडे करून घालावे व सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटावं.
मटणाला हा मसाला व लिंबाचा रस चोळून तीन तास झाकून ठेवावं.
प्रेशरकुकरमध्ये मसाल्यासकट मटण घालून दहा-पंधरा मिनिटं परतावं.
मग प्रेशर ठेवून एक शिट्टी आल्यावर गॅस बंद करावा.
प्रेशर गेल्यावर कुकर उघडून मसाला चांगला घट्ट होईपर्यंत पुन्हा परतावं.
वाढायच्या भांड्यात काढून गरम असतानाच वरून बटर घालावं.
Leave a Reply