
मोती पुलाव ( मांसाहारी )
साहित्य :
दोन वाट्या बासमती तांदूळ
पाव वाटी तूप
बदाम
पिस्ते
काजू आणि बेदाणे एक मोठा चमचा
पाच सहा लवंगा
आठ-दहा मिरी
दोन-तीन इंच दालचिनी
दोन-तीन बडी वेलची
दोन तमालपत्र
मीठ
एका लिंबाचा रस
अर्धा चमचा कच्चा मसाला
गोळ्यांसाठी :
अर्धा किलो खिमा
चार-पाच हिरव्या मिरच्या
दहा-बारा लसूण पाकळ्या
एक इंच आलं
अर्धी वाटी कोथिंबीर
एक चमचा गरम मसाला
मीठ
थोडं डाळीचं पीठ
तेल
वर्ख
कृती:
खिमा स्वच्छ धुऊन निथळावा.
गोळ्यासाठी दिलेलं तेल आणि वर्ख वगळता इतर साहित्य खिम्यात घालून तो बारीक वाटावा.
या मिश्रणाचे छोटे छोटे बोराएवढे गोळे करून तेलात तळून घ्यावे आणि त्यापैकी काहींना वर्ख लावून बाजूला ठेवावे.
बाकीचं मिश्रण भातात मिसळण्यासाठी वापरावं.
तांदूळ धुऊन निथळावे. चार-पाच वाट्या पाणी उकळावं.
जाड बुडाच्या पातेलीत तूप तापवून प्रथम सुकामेवा तळून काढून ठेवावा.
उरलेल्या तुपात अख्खा गरम मसाला फोडणीला घालून तांदूळ परतावे.
उकळतं पाणी, मीठ आणि लिंबाचा रस घालून तांदूळ बोटचेपा शिजला की वर्ख न लावलेले खिम्याचे गोळे भातात मिसळावे
घट्ट झाकण ठेवून दमदार वाफ येऊ द्यावी. पुलाव वाढताना वर वर्ख लावलेले गोळे घालून तो वाढावा.
Leave a Reply