
मिक्स व्हेज
साहित्य:
श्रावण घेवडा
गाजर
ढोबळी मिरची
मटार- प्रत्येकी एक वाटी
कोबी दोन वाट्या
बटाटे तीन मोठे
कांदे दोन मोठे
टोमॅटो दोन
गरम मसाला
तिखट
आलं-लसूण वाटण प्रत्येकी एक चमचा
जिरे अर्धा चमचा
हळद अर्धा चमचा
मीठ
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, साय फेटून एक वाटी.
कृती :
भाज्या आवडीनुसार (लहान-मोठ्या) चिरून घ्याव्यात.
तेलावर आलं-लसूण वाटण परतावं. त्यावर जिरे, कांदा घालून कांदा लाल होईपर्यंत परतावं.
टोमॅटो परतून शिजवावा. तिखट, हळद, मीठ घालून चांगलं परतावं. त्यावर फेटलेली साय घालून ढवळावं.
बटाटा-मटार घालून परत पाच मिनिटं परतावं. बटाटा-मटार अर्धेकच्चे असतानाच कोबी, श्रावण घेवडा, गाजर घालावं.
सर्व भाज्या शिजत आल्यावर शेवटी ढोबळी मिरची घालून चांगलं परतावं.
तेल सुटेपर्यंत शिजवल्यानंतर त्यावर गरम मसाला, धनेपूड घालून एक वाफ आणावी. वाढताना वरून कोथिंबीर घालावी.
Leave a Reply