
मिस्सी रोटी
साहित्य :
कणिक एक वाटी
बेसन अर्धी वाटी
मक्याचं पीठ अर्धी वाटी
चिरलेली मेथी अर्धी वाटी
दोन हिरव्या मिरच्या
ओवा एक चमचा
तिखट एक चमचा
मीठ
तेल दोन चमचे
दही अर्धी वाटी
कृती :
वरील सर्व पदार्थ एकत्र करून पीठ भिजवावं.
जरूर पडली तरच पाणी घालावं.
थापून तव्यावर रोटी भाजून घ्यावी.
भाजताना कडेनं तूप सोडावं म्हणजे रोटी खरपूस होते.
Leave a Reply