
मिरचीचे लोणचे
साहित्य :
पाव किलो लांब मोठ्या
कमी तिखट जातीच्या मिरच्यांचे एक इंच लांबीचे तुकडे करावेत.
आलं-लसूण वाटण दोन चमचे
बडीशोप
मेथी दाणे
कलौंजी
जीरा प्रत्येकी दीड चमचा
मीठ साडेचार चमचे
हळद दीड चमचा
हिंग अर्धा चमचा
आमचूर अर्धा चमचा
चिंच-गुळाची चटणी एक वाटी
व्हिनेगर अर्धी वाटी
मोहरीचं तेल चांगलं तापवून गार केलेलं एक वाटी
अर्धा चमचा सोडियम बेन्झॉइट
कृती:
कढईत तेल गरम करून त्यात मिरच्यांचे तुकडे रंग बदलेपर्यंत परतावे.
सर्व मसाला घालून पाच मिनिटं परतावं.
चिंच-गुळाची चटणी घालून आणखी पाच मिनिटं परतावं.
व्हिनेगर व सोडियम बेन्झोएट घालून उतरवावं.
Leave a Reply