
मेथी मटार मलाई
साहित्य :
मेथी अर्धी वाटी चिरून
मटार पाव वाटी
एका टोमॅटोची प्युरी
पालक प्युरी पाव वाटी
तमालपत्र एक
काजू पाकळी दहा बारा
लवंगा दोन
वेलची दोन
लसूण वाटण अर्धा चमचा
आलं वाटण अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
साखर अर्धा चमचा
दूध
बटर दोन चमचे
क्रीम दोन चमचे
तेल दोन चमचे
मीठ
सफेद ग्रेव्हीसाठी :
कांदा चिरून एक वाटी
काजू पंचवीस ग्रॅम
मगज बी पंचवीस ग्रॅम
दालचिनी दोन
लवंगा दोन
हिरव्या मिरच्या तीन
ग्रेव्ही करताना :
कांदा वगळता बाकी सर्व जिन्नस पाव वाटी पाण्यात भिजवून ठेवावे.
पंधरा-वीस मिनिटांनी त्यातली दालचिनी, लवंग काढून बाकी सर्व जिन्नस आणि चिरलेला कांदा मिक्सरमधून फिरवून वाटण करून घ्यावं.
त्यात पाव वाटी दूध घालून ठेवावं.
कृती :
चिरलेली मेथी दोन-तीन मिनिटं उकळलेल्या पाण्यातून काढून घ्यावी.
बटर गरम करून त्यात तेल घालावं.
त्यावर तमालपत्र, लवंग, दालचिनी, परतून त्यावर मेथी घालावी.
दोन-तीन मिनिटं परतून आलं-लसूण वाटण घालावं.
टोमॅटो प्युरी घालून चांगलं परतावं.
चांगलं शिजल्यावर त्यात आधी तयार केलेली सफेद ग्रेव्ही व पालक प्युरी घालावी.
गरम मसाला, साखर, दूध, क्रीम, मटार, मीठ, सर्व घालून ग्रेव्ही मिळून येईपर्यंत शिजवावी.
Leave a Reply