
मटार भात
साहित्य :
एक वाटी तांदूळ
एक ते दीड वाटी मटार
तीन-चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे
पाव वाटी ओलं खोबरं
पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
दोन चमचे तूप
दोन-तीन मध्यम आकाराचे टोमॅटो
मीठ
एक चमचा गरम मसाला
एक चमचा गोडा मसाला
एक मध्यम डाव तेल.
कृती :
तांदूळ आधी धुऊन निथळत ठेवावेत. नंतर तेलाची खमंग फोडणी करावी.
मटार दाणे स्वच्छ धुऊन त्यात घालावेत. नंतर झाकण ठेवावं.
गॅस जरा बारीक करावा. नंतर मिरच्यांचे तुकडे, तांदूळ, मसाले, मीठ घालून आधणाचं पाणी घालावं.
टोमॅटोच्या चकत्या कराव्यात. भाताला चांगल्या वाफ आल्यावर उतरवावा.
टोमॅटोच्या चकत्या, चिरलेली कोथिंबीर, खोबरे घालून सजवावा. वाढताना साजूक तूप घालावं.
Leave a Reply