
मटार मशरूम
साहित्य:
मटारचे दाणे दोन वाट्या
हिंग चिमूटभर
जिरे एक चमचा
मशरूम पाव किलो
कांदे तीन मोठे
लसूण वाटण तीन चमचे
टोमॅटो चार मध्यम आकाराचे
तेल पाव वाटी
गरम मसाला अर्धा चमचा
धनेपूड एक चमचा
हळद पाव चमचा
तिखट अर्धा चमचा
चिरलेली कोथिंबीर पाव वाटी
कृती:
कांदे फोडी करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. टोमॅटो चिरून मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यावी. मशरूमचे प्रत्येकी दोन किंवा चार तुकडे करून घ्यावे.
कुकरमध्ये तेल गरम करून हिंग, जिरे घालावं.
वाटलेला कांदा घालून तांबूस लाल रंगावर परतावा.
मग वाटलेला लसूण घालून दोन मिनिटं परतावं.
त्यावर टोमॅटो प्युरी घालून तेल सुटू लागेपर्यंत परतावं.
मग पाव वाटी पाणी घालून उकळी आली की, हळद, तिखट, धनेपूड व मीठ घालावं.
नीट ढवळून त्यात मटारचे दाणे व एक वाटी पाणी घालावं आणि मशरूम घालून प्रेशर कुकर बंद करून एक शिट्टी होईपर्यंत शिजवून गॅस बंद करावा.
गरम मसाला व कोथिंबीर घाला.
Leave a Reply