चार वाट्या चिरलेल्या भाज्या (फ्लॉवर, तोंडली, बटाटे, मटार, वांगी, ओला हरभरा, पावटे इत्यादींपैकी आवडीनुसार घ्याव्या.)
मसाल्यासाठी :
सहा लवंगा
दालचिनीच्या तीन काड्या
पाव वाटी धने
एक चमचा गोडं जिरं
एक चमचा शहाजिरं
दोन बडी वेलची
पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
सात सुक्या मिरच्या
पाव वाटी कोथिंबीर
आणि एक मोठा चमचा तीळ
कृती :
प्रथम तीळ, खोबरं आणि धने कोरडे भाजावे.
थोड्या तेलावर मसाल्याचे बाकी जिन्नस परतून घेऊन कोथिंबिरीसह सगळं एकत्र वाटून घ्यावं.
तांदूळ धुऊन चाळणीत निथळत ठेवावे.
चार-पाच वाट्या पाणी उकळत ठेवावं.
जाड बुडाच्या भांड्यात तेल तापवून फोडणी करावी त्यावर भाज्या परताव्या.
त्यावर तांदूळ परतून काजू, आलं आणि वाटलेला मसाला घालून परतावं.
खमंग वास सुटल्यावर जरुरीनुसार पाणी, मीठ घालून भात शिजवावा.
वाढताना वर खोबरं, कोथिंबीर घालावी.
Leave a Reply