
मलबारी पुलाव
साहित्य:
दोन वाट्या तांदूळ,
नारळाचं दूध एक वाटी
थोडे ओल्या खोबऱ्याचे पातळ काप
तीन कांदे चिरून
एक चमचा आलं पेस्ट
एक चमचा लसूण पेस्ट
एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा
पाव चमचा हळद
दहा-पंधरा काजू पाकळ्या
मीठ
एक मोठा चमचा साजूक तूप
कच्चा खडा मसाला
पाच-सहा लवंग
दालचिनी
साखर
कृती:
तुपावर कांदा, लसूण, आलं- मिरची वाटण घालून परतावं.
याचबरोबर ओल्या खोबऱ्याचे तुकडेही घालावेत. चांगले परतावे.
एकीकडे तांदूळ धुऊन ठेवावेत. ते निथळू द्यावेत.
मसालाही परतण्यास घालावा. सर्व नीट परतून होत आलं की मीठ घालावं.
नंतर धुतलेले तांदूळ घालावे. तेही परतून घेऊन आधणाचं पाणी घालून भात तयार करावा.
एरवीपेक्षा पाणी थोडं कमी घालून नारळाचं दूध घालावं.
साखर घालावी आणि झाकण ठेवावं. भाताला चांगली वाफ आणून खाली उतरवावा.
वाढताना तळलेले काजू आणि आवडत असेल तर थोडा तळलेला कांदा घालावा.
Leave a Reply