

मलाई कोफ्ता
साहित्य :
कोफ्ता करण्यासाठी
अर्धी वाटी पनीर
आठ चमचे मैदा
एक सपाट चमचा बेकिंग पावडर
चार हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
मीठ
तळण्यासाठी तूप
क्रिम किंवा लोणी
सारासाठी मसाला साहित्य :
एक मोठा कांदा
अर्धी वाटी ओले खोबरे
सात-आठ लसूण पाकळ्या
दोन हिरव्या मिरच्या
दोन लाल सुक्या मिरच्या
दोन चमचे धने
एक चमचा जिरे
दोन दालचिनीच्या काड्या
पाच चमचे चारोळी
दोन चमचे खसखस
एक इंच आले
कोथिंबीर
तीन टोमॅटो
कृती :
सर्वप्रथम मसाल्याचे सर्व जिन्नस एकत्र करून, वाटून गोळी करावी.
पनीर, मैदा, बेकिंग पावडर, चिरून घेतलेल्या मिरच्या, चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालून मिसळावे व चांगले मळावे,
या मिश्रणाचे बोराएवढे गोळे तयार करून बदामी रंगावर तळून घ्यावेत.
लसूण, कांदा व टोमॅटो चिरून, चार वाट्या पाणी घालून शिजवावेत.
नंतर पुरण वाटण्याच्या यंत्रातून गाळून घ्यावे.
पातेल्यात तूप घालून तापल्यावर मसाल्याची गोळी घालून परतून घ्यावी.
त्यावर लाल तिखट घालून पुन्हा परतावे व त्यावर टोमॅटो-कांद्याचे गाळून घेतलेले पाणी घालून उकळी आणावी.
उकळत असताना दोन चमचे क्रीम किंवा लोणी घालावे. चवीप्रमाणे मीठ घालावे.
या सारामध्ये तळून ठेवलेले कोफ्ते सोडावेत. गरम असताना खावयास द्यावे.
Leave a Reply