
मक्के दि रोटी
साहित्य :
मक्याचं पीठ दीड वाटी
चिरलेली मेथीची पानं अर्धी वाटी
किसलेला मुळा पाव वाटी
ओवा अर्धा चमचा
मीठ
कृती :
पिठात मुळा व मेथी, मीठ व ओवा घालून पीठ भिजवावं.
मुळ्याचा व मेथीचा ओलसरपणा असतोच. जरूर पडल्यास थोडं कोमट पाणी घालावं.
मोठाले गोळे करावे आणि प्लास्टिकच्या कागदावर लाटावं.
मंद आचेवर तवा ठेवून भाजावं.
मंद आचेवरच रोटी चांगली होते.
ही रोटी दाल मखनी बरोबर किंवा सरसों का साग बरोबर देतात.
Leave a Reply