
लोबिया सॅलड ( चवळीचे सॅलड )
साहित्य :
लोबिया चवळी एक वाटी,
कांदा टोमॅटो एकेक बारीक चिरून
हिरवी मिरची एक बारीक चिरून
कोथिंबीर बारीक चिरून दोन चमचे
चाट मसाला एक चमचा
मीठ
एका लिंबाचा रस
कृती :
लोबिया दोन तास भिजत टाकावेत. दोन वाट्या पाणी व मीठ घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवावेत.
एक शिट्टी झाली की गॅस बारीक करून पाच मिनिटं शिजवावे
लोबिया मऊ शिजले पाहिजेत. पाणी शिल्लक असेल तर काढून टाकावं.
शिजलेल्या लोबिया बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, लिंबाचा रस, कोथिंबीर व चाट मसाला घालून मिसळावं व कोशिंबीर सारखं वाढावं.
राजमा व छोले यांचंही असं सॅलड करतात.
Leave a Reply