
लौकी के कोफ्ते
साहित्य :
दुधी भोपळा पाव किलो
बेसन अर्धी वाटी
ओवा पूड अर्धा चमचा
तिखट पाव चमचा
गरम मसाला पाव चमचा
हिरवी मिरची एक
कोथिंबीर
मोठे कांदे दोन किसून
टोमॅटो दोन किसून
आलं-लसूण वाटण एक चमचा
तळण्यासाठी तेल
फोडणीसाठी
तेल तीन चमचे
हिंग चिमूटभर
जिरे एक चमचा
धनेपूड एक चमचा
कृती : कोफ्ता
कोफ्त्यासाठी दुधीची सालं काढून किसून घ्यावा. त्यात बेसन
ओवा, मीठ, तिखट, हिरवी मिरची घालून लहान गोल गोळे करावेत.
गरम तेलात तळून काढावेत.
कृती : रस्सा
तेल तापवून हिंग, जिरे घालावं. त्यावर आलं-लसूण व कांदा घालून परतावं.
कांदा लाल तांबूस रंगाचा झाला की, टोमॅटो, तिखट, मीठ, एक चमचा धनेपूड घालावी.
मंद आचेवर टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजू द्यावे. मग दोन वाट्या पाणी घालून उकळी आणावी.
रश्श्यात कोफ्ते घालावे.
कोथिंबीर व गरम मसाला घालून हलक्या हाताने एकदा ढवळावे.
Leave a Reply