
लच्छा पराठा
साहित्य :
मैदा एक वाटी
बटाटा तीन-चार उकडून
दही एक मोठी वाटी
जिरे एक चमचा
धनेपूड अर्धा चमचा
गरम मसाला पाव चमचा
हिरव्या मिरच्या तीन चिरून
कसूरी मेथी
मीठ
कृती :
मैद्यात मीठ, जिरं, कसूरी मेथी आणि दही घालून घट्ट गोळा भिजवून घ्यावा.
उकडलेले बटाटे कुस्करून त्यात धनेपूड, मीठ, गरम मसाला, हिरवी मिरची घालून एकजीव करावं.
भिजवलेल्या मैद्याचे आणि बटाट्याच्या सारणाचे समान गोळे करून घ्यावेत.
मैद्याच्या गोळ्यात बटाट्याचं सारण पुरणाच्या पोळीसाठी भरतो त्याप्रमाणे भरून घ्यावं.
पराठे लाटून तळावेत अथवा कडेनं तेल वा तूप सोडून भाजून घ्यावेत.
Leave a Reply