
कोथिंबीर पुदिना चटणी
साहित्य :
कोथिंबीर पाव किलो,
पाव किलो पुदिना
हिरव्या मिरच्या पाच सहा
मोठे कांदे तीन
दोन लिंबाचा रस
साखर दीड चमचा
मीठ.
कृती :
कोथिंबीरची पानं, पुदिन्याची पानं, मिरच्या चिरून घ्याव्या.
कांदे चिरून घ्यावे. दोन लिंबांचा रस काढावा.
मिक्सरमध्ये सर्व एकत्र बारीक वाटावं.
बिर्याणी, पराठे, पकोडे याबरोबर ही चटणी देतात.
Leave a Reply