
रसा कोळंबी भात
साहित्य :
दोन वाट्या आंबेमोहोर किंवा बासमती तांदूळ
दोन वाट्या सोललेली कोलंबी
दोन चमचा आलं लसूण वाटण
एक चमचा तिखट
एक चमचा गरम मसाला
अर्धी वाटी तेल
चार-पाच लवंगा
पाव चमचा मिरी
पाव चमचा शहाजिरं
पाच हिरवे वेलदोडे
दोन-तीन दालचिनीच्या काड्या
दोन-तीन तमालपत्र
बडीशेपेची पूड एक चमचा
दोन वाट्या नारळाचं दूध
दोन वाट्या उकळतं पाणी
चवीनुसार मीठ
पाव वाटी तेल
चिरलेली कोथिंबीर
कृती:
तांदूळ धुऊन निथळावे. कोलंबी स्वच्छ धुऊन तिला आलं-लसूण वाटण, हळद, मीठ, तिखट लावून बाजूला ठेवावी.
जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून अख्खा मसाला फोडणीला टाकावा.
त्यावर तांदूळ परतून गरम मसाला, बडीशेपेची पूड आणि कोलंबी घालून परतावं.
जरुरीनुसार मीठ आणि उकळतं पाणी घालून तांदूळ अर्धवट शिजवावा.
नंतर त्यात नारळाचं दूध घालून नेहमीप्रमाणे वाफ आणावी.
दूध घातल्यावर भात करपण्याची शक्यता असते म्हणून भाताच्या भांड्याखाली तवा ठेवावा.
वाढताना वर चिरलेली कोथिंबीर आणि आवडत असल्यास थोडं साजूक तूप घालावं.
Leave a Reply