
कोळंबी बिर्याणी
साहित्य :
तीन वाट्या बासमती तांदूळ
एक किलो मोठ्या आकाराची कोळंबी
प्रत्येकी दीड वाटी उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो
पाच सहा हिरव्या मिरच्या
एक इंच आलं
पंधरा लसूण पाकळ्या
दोन मोठा चमचा लिंबाचा रस
एक चमचा गरम मसाला
अर्धी-पाऊण वाटी तेल
एक वाटी तळलेला कांदा
अर्धी वाटी तळलेले काजू
फोडणीसाठी :
आठ-दहा लवंग, दोन-तीन दालचिनी, पाव चमचा मिरी, तमालपत्र.
कृती :
कोळंबी साफ करून त्यातला काळा धागा काढून स्वच्छ धुवावा.
आलं-लसूण, मिरच्या, मीठ, लिंबाचा रस वाटून ती गोळी कोळंबीला लावून ठेवावी.
तांदूळ धुऊन निथळावे. पाव वाटी तेलात अख्खा गरम मसाला फोडणीला टाकून त्यावर तांदूळ परतावे
त्यानंतर दुप्पट पाणी घालून मोकळा सळसळीत भात शिजवावा.
जाड बुडाच्या भांड्यात उरलेलं तेल तापवून त्यावर कांदा, टोमॅटो परतावा.
गरम मसाला, कोळंबी घालून एक वाफ आणावी.
नंतर त्यावर नेहमीच्या पद्धतीनं भात, तळलेला कांदा, काजू इत्यादींचा थर देऊन बिर्याणी शिजवावी.
Leave a Reply