
पंजाबी खिमा-मसूर बिर्याणी
साहित्य :
तीन वाट्या बासमती तांदूळ
अर्धा किलो खिमा
एक वाटी मसूर (भिजत घालून)
आलं-लसूण- मिरची-कोथिंबिरीची वाटण एक मोठा चमचा
एक चमचा लाल तिखट
एक चमचा गरम मसाला
हळद
मीठ
एक मोठा चमचा धने-जिऱ्याची पूड
दीड वाटी चिरलेला टोमॅटो
एक वाटी बारीक चिरलेला कांदा
एक वाटी कुरकुरीत तळलेला कांदा
बटाट्याचे काप एक वाटी तळून अर्धी वाटी
तळलेल्या काजू पाकळ्या
तूप
फोडणीसाठी :
दहा लवंगा, चार तमालपत्रं, पाव चमचा काळी मिरी, दोन दालचिनी.
कृती:
तांदूळ धुऊन निथळावे. तुपात अख्खा मसाला फोडणीला घालून नेहमीच्या पद्धतीनं मोकळा भात शिजवून घ्यावा.
खिमा स्वच्छ धुऊन निथळून त्याला मीठ, हळद, हिरव्या मसाल्याची वाटण लावावी.
जाड बुडाच्या भांड्यात तूप तापवून त्यात कांदा लालसर परतावा.
त्यावर तिखट, गरम मसाला, धने-जिन्याची पूड, टोमॅटो परतून मसूर आणि मीठ घालून परतावं.
खिमा घालावा आणि जरूरीनुसार उकळतं पाणी घालून सरबरीत शिजवावा.
त्यावर निम्मा भात पसरावा. त्यावर तळलेला कांदा, बटाट्याचे काप पसरून उरलेला भात पसरावा.
त्यावर तळलेले काजू घालून घट्ट झाकण लावावं आणि कणकेनं सील करून मंद आचेवर तव्यावर भांडं ठेवून वाफ येऊ द्यावी.
सोबत दही-कांद्याची कोशिंबीर द्यावी.
Leave a Reply