खान्देशी खिचडी

khandeshi-khichdi-marathi-recipe

खान्देशी खिचडी

साहित्य :

दोन वाट्या तांदूळ,

एक वाटी तुरीची डाळ

तेल

मोहरी

हिंग

तिखट

मीठ

पाव वाटी बारीक चिरलेला लसूण

अर्धी वाटी तेल

पाव वाटी सुक्या मिरच्यांचे तुकडे.

कृती :

डाळ-तांदूळ एकत्र धुऊन ठेवावे.

सहा वाट्या पाणी उकळत ठेवावं.

एका जाड बुडाच्या भांड्यात थोडं तेल तापवून मोहरी, हिंग आणि तिखट घालून त्यावर डाळ-तांदूळ परतावे.

चवीनुसार मीठ आणि जरुरीनुसार पाणी घालून खिचडी मऊ शिजवावी.

अर्धी वाटी तेल तापवून त्यात लसूण आणि मिरच्या कुरकुरीत तळाव्या.

खिचडी वाढल्यावर त्यावर ही लसूण-मिरच्यांची फोडणी घालावी.

ज्यांना जास्त तिखट आवडतं ते त्यात मिरच्या कुस्करून खाऊ शकतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.