
केळफुलाची भाजी
साहित्य :
एक केळफूल
अर्धी वाटी मुगाची डाळ
एक चमचा जिरे
तिखट
मीठ
गूळ
खोबरे
कोथिंबीर
फोडणीचे साहित्य
कृती :
केळफुलावरील तांबडी पाने काढून टाकून आतील फुलाच्या फण्या व पांढरे केळफूल घ्यावे.
फुलाच्या फण्यातील फुलाप्रमाणे असलेल्या भागात मध्ये एक बारीक दांडा (केसर) असतो.
तो काढून व त्याच्याबरोबरच त्याच्याखाली असलेला एक वाटीसारखा भाग निघून येतो, तोही काढून टाकावा.
हे भाग ठेवल्यास ते शिजत नाहीत. नंतर फण्या आणि पांढरे केळफूल बारीक चिरून, आंबट ताक अगर चिंचेच्या पाण्यात पाच ते सहा तास घालून ठेवावे.
मुगाची डाळ भिजत घालावी. चिरलेले केळफूल उकडून, त्याचे पाणी काढून टाकावे.
फोडणी करून त्यात मुगाची डाळ घालावी.
डाळ शिजल्यावर त्यात उकडलेले केळफूल घालून त्यात आपल्या चवीप्रमाणे मीठ, गूळ, जिऱ्याची पूड आणि किसलेले अगर खोवलेले खोबरे घालावे.
कोथिंबीर घालावी. मुगाची डाळ नको असल्यास तुरीची डाळ अगर दाण्याचे कूट घालूनही ही भाजी चांगली होते.
Leave a Reply