
कारल्याच्या चकत्या
साहित्य :
कारली
तिखट
मीठ
साखर
लिंबू
सुक्या खोबऱ्याचा कीस
कोथिंबीर
फोडणीचे साहित्य
कृती :
कारल्याच्या पातळ चकत्या करून, त्यांना मीठ लावून चकत्या एका फडक्यात बांधून ठेवाव्यात व त्यांवर वजन ठेवावे.
चकत्या साधारण अर्धा तास ठेवाव्यात, म्हणजे त्यांचे कडू पाणी निघून जाईल.
नंतर जरा जास्त फोडणी करून त्यावर त्या चकत्या टाकून कुरकुरीत होईपर्यंत परताव्यात.
नंतर त्यांवर चवीप्रमाणे मीठ, तिखट व साखर घालून, थोडे लिंबू पिळावे.
खोबऱ्याचा कीस घालावा. भाजी चांगली मिसळावी आणि वर कोथिंबीर घालावी.
यात काजू व बेदाणाही घालतात.
Leave a Reply