
कैरीचे लोणचे
साहित्य :
कैऱ्या दोन किलो
बडिशोप
मेथी दाणे
मोहरी व तिखट प्रत्येकी शंभर ग्रॅम
मीठ तीनशे ग्रॅम
हिंग पूड अर्धा चमचा
जिरे पन्नास ग्रॅम
कलौंजी (कांद्याचं बी) वीस ग्रॅम
हळद तीस ग्रॅम
मोहरीचे तेल एक लिटर.
कृती:
कैद्यांचे एक-एक इंच आकाराचे तुकडे करावे.
त्यांना मीठ व हळद लावून रात्रभर किंवा बारा तास ठेवावे.
त्याला सुटलेलं पाणी निथळून कैद्यांचे तुकडे कापडावर पसरून टाकावे. कोरडे होऊ द्यावे.
दोन वाट्या मोहरीच्या तेलात सर्व मसाला कालवावा.
त्यात कैरीच्या फोडी घालून नीट मिसळावं आणि स्वच्छ कोरड्या बरणीत भरावे.
नंतर उरलेलं सर्व तेल त्यावर ओतावं. फोडींच्या वर तेल येईल.
एक आठवडा न हलवता तसंच ठेवावं
मग मोठ्या चमच्यानं सर्व नीट कालवून बरणी बंद करून पुन्हा एक आठवडा न हलवता ठेवावी.
मुरलेलं लोणचं खाण्यास घ्यावं.
Leave a Reply