
कढी पकोडा
साहित्य
कढीसाठी :
आंबट दही दोन वाट्या
बेसन एक वाटी
मोहरी एक चमचा
जिरे एक चमचा
हळद एक चमचा
मेथी दाणे अर्धा चमचा
तिखट एक चमचा
सुक्या लाल मिरच्या दोन तीन
हिंग चिमूटभर
मीठ
कढिपत्ता पानं दहा-बारा
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
आलं-लसूण वाटण एक चमचा
तेल तीन चमचे
एक हिरवी मिरची
तळणीसाठी तेल
पकोड्यांसाठी:
बेसन एक वाटी
ओवा एक चमचा
तिखट एक चमचा
मीठ
चिरलेल्या भाज्याचं मिश्रण एक वाटी (पालक, कांदा, गाजर, बटाटा इ.)
कृती:
बेसन, चिरलेल्या भाज्या, मीठ, तिखट, चिरलेली हिरवी मिरची, ओवा सर्व एकत्र करून जरूर तेवढं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवावं.
गोल गोळे करून, कढईत तेल गरम करून पकोड़े तळून काढून बाजूला ठेवावे.
कढी:
दह्यात बेसन आणि चार-पाच वाट्या पाणी घालावं. घुसळून एकजीव करावं.
त्यात वाटलेलं आलं-लसूण, मीठ, हळद, तिखट घालून नीट मिसळून घ्यावं.
तेल गरम करून मोहरी, जिरे, मेथी, हिंग घालावं, त्यात घुसळलेलं दही घालून ढवळत राहावं. उकळू द्यावं.
आख्ख्या लाल मिरच्या घालाव्या. कढी दाट असावी.
पकोडे, कोथिंबीर, कढीपत्ता घालून झाकून ठेवावी.
साध्या भाताबरोबर गरम वाढावी.
Leave a Reply