
कढाई पनीर
साहित्य :
पनीर पाव किलो
तेल तीन चमचे
आलं-लसूण वाटण एक चमचा
मीठ
हिरव्या मिरच्या
मेथी दाणे आठ-दहा
सुक्या लाल मिरच्या दोन
धने पाव चमचा
कांदा एक मोठा
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
भाजलेल्या दाण्याची पूड एक चमचा
हळद पाव चमचा
लाल मिरच्यांचं वाटण दोन चमचे
टोमॅटो दोन
ढोबळी मिरची चिरून अर्धी वाटी
गरम मसाला अर्धा चमचा
कसूरी मेथी एक चमचा
क्रीम अर्धी वाटी.
कृती :
पनीरचे मोठे चौकोनी तुकडे करावेत.
हिरव्या मिरच्या बारीक चिराव्या.
कांद्याच्या एक इंच मोठाल्या फोडी कराव्या.
दोन सुक्या लाल मिरच्या दोन-तीन तास पाण्यात भिजवून वाटून घ्याव्या.
टोमॅटोच्या मोठ्या फोडी कराव्या.
कढईत तेल तापवून हिरवी मिरची व वाटलं आलं-लसूण घालून परतावं.
सुक्या लाल मिरच्या, मेथी दाणे, धने घालून परतावं.
कांदा आणि पनीर घालून परतावं. जिरंपूड, गरम मसाला, वाटलेल्या लाल मिरच्या, मीठ आणि अर्धी वाटी पाणी घालावं.
टोमॅटो, ढोबळी मिरची घालून नीट मिसळून, दोन-तीन मिनिटं परतावं. खाली उतरवल्यावर कसूरी मेथी, क्रीम, कोथिंबीर घालावं.
Leave a Reply