
हरियाली मटार पुलाव
साहित्य :
दोन वाट्या बासमती तांदूळ
तीन वाटी मटाराचे दाणे
एक इंच आलं
दहा बारा लसूण पाकळ्या
पाच सहा हिरव्या मिरच्या
पालकाची सात ते आठ पानं
अर्धी वाटी कोथिंबीर
एक चमचा लिंबाचा रस
अर्धा चमचा कच्चा कुटलेला गरम मसाला
अर्धी वाटी उभा पातळ चिरलेला कांदा
तीन मोठा चमचा तूप
लवंग
दालचिनी
तमालपत्र
मीठ
काजू
बेदाणे
थोडी हळद
पुदिना
कृती :
तांदूळ स्वच्छ धुऊन निथळावे. चार पाच वाट्या पाणी उकळावं.
आलं, लसूण, मिरच्या कोथिंबीर, पालक आणि लिबाचा रस एकत्र वाटा आणि हिरवा मसाला बनवून घ्या.
जाड बुडाच्या भांड्यात तूप तापवून गरम मसाला फोडणीला टाकावा.
त्यावर कांदा आणि हिरवा मसाला परतावा.
मटार आणि चिमूटभर हळद घालून नंतर तांदूळ परतावे
काजू-बेदाणे, कच्चा कुटलेला मसाला आणि मीठ घालून उकळत पाणी घालून पुलाव शिजवावा.
शेवटी थोडा पुदिना चिरून घालावा आणि एक वाफ आणावी.
तयार आहे खमंग असा हरियाली मटार पुलाव
Leave a Reply