हरा-भरा कबाब
साहित्य :
बारीक चिरलेलं पनीर
मटार दाणे शिजवून कुस्करलेले
किंचित शिजवून घेऊन चिरलेली पालकाची पानं, ब्रेडचा चुरा- सगळं अर्धी-अर्धी वाटी
आलं वाटण एक चमचा
मिरपूड अर्धा चमचा
गरम मसाला पाव चमचा
बेसन दोन चमचे
फुटाण्याचा कूट पाच-सहा चमचे
मीठ
कृती :
वरील सर्व जिन्नस नीट एकत्र मिसळून चपटेसे गोल कबाब करावे व तळून काढावे
किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये थोड्या तेलावर परतून काढावे.
वरून चाट मसाला भुरभुरावा.
Leave a Reply