
गाजर मटार
साहित्य :
गाजर अर्धा किलो
मटार दाणे पाव किलो
कोथिंबीर
धनेपूड दोन चमचे
तिखट अर्धा चमचा
हळद पाव चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
मीठ
तेल तीन चमचे.
कृती :
गाजर धुऊन सोलून पाव इंच चौकोनी तुकडे करावेत.
तेल तापवून त्यात हिंग, जिरे, धनेपूड, तिखट, हळद घालावी मग मटार दाणे आणि मीठ घालावं.
नीट ढवळून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावं.
गाजर आणि मटार शिजल्यावर चिरलेली कोथिंबीर व गरम मसाला घालावा.
Leave a Reply