गाजर हलवा

gajar-halwa-recipe-marathi

gajar-halwa-recipe-marathi

गाजर हलवा

साहित्य :

गाजर एक किलो

साखर दोन वाट्या

तूप वाटीभर

दूध एक लिटर

काजू बदामांचे तुकडे अर्धी वाटी

बेदाणे दहा पंधरा

पाच वेलदोड्यांची पूड

कृती :

गाजरं धुऊन सालं काढून किसून घ्यावीत.

गाजराचा कीस व दूध मिसळून मंद आचेवर शिजत ठेवावं.

दूध आटलं की साखर घालून हलवत राहावं.

साखर विरघळली की कोरडं होईपर्यंत परतत राहावं.

कोरडं झाल्यावर मग तूप व वेलदोड्यांची पूड घालावी आणि आणखी पाच-दहा मिनिटं ढवळावं.

हवा असल्यास अर्धी वाटी कुस्करलेला खवाही तुपाबरोबर घालावा.

वाढायच्या भांड्यात काढून वरून काजू-बदाम-बेदाणे पसरावे. गरम खायला द्यावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.