
फुलगोबी मटार
साहित्य :
फ्लॉवर अर्धा किलो
मटार पाऊण वाटी
तिखट अर्धा चमचा
हळद अर्धा चमचा
धनेपूड एक चमचा
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
हिरवी मिरची एक चिरून
तेल सहा चमचा
जिरे एक चमचा
हिंग चिमूटभर
आलं एक इंच किसून
कृती :
फ्लॉवर धुऊन लहान आकारात तुकडे करावेत.
कढईत तेल तापवून जिरे, हिंग घालावं. त्यावर आलं, हिरवी मिरची घालावी व दोन्ही कुरकुरीत तपकिरी होईपर्यंत परतावं.
फ्लॉवर व मटार दाणे, मीठ, तिखट, हळद, धनेपूड घालून नीट मिसळावं.
मंद आचेवर शिजू द्यावं.
वाढताना वरून कोथिंबीर पसरावी.
Leave a Reply