
फोडणीचा भात
साहित्य :
एक वाटी तांदळाचा साधा शिजवलेला भात,
बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
तीन-चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे
पाव वाटी शेंगदाणे
मोहरी
हिंग
हळद
दोन मोठे चमचे तेल
कोथिंबीर
मीठ
लिंबू
कृती:
यासाठी शक्यतो शिळा भात वापरावा.
भात हातानं मोकळा करून घ्यावा.
त्यात चवीनुसार मीठ घालावं.
कढईत तेल तापवून प्रथम शेंगदाणे तळून घेऊन ते भातावर घालावे.
नंतर उरलेल्यातेलात मोहरी, हिंग, हळद, मिरच्या आणि कांदा फोडणीला घालून त्यावर भात परतावा.
भात मोकळा झाला की लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून खायला द्या.
Leave a Reply