फ्लॉवर टिक्का

flower-tikki-recipe-marathi

flower-tikki-recipe-marathi

फ्लॉवर टिक्का

साहित्य :

फ्लॉवर पाव किलो

चक्का दोन चमचे

आलं-लसूण वाटण एक चमचा

कसूरी मेथी एक चमचा

मीठ

एका लिंबाचा रस

तिखट अर्धा चमचा

गरम मसाला अर्धा चमचा

दोन चमचे बेसन किंवा कॉर्नफ्लोअर

दोन चमचे तेल

कृती :

बेसन व तेल सोडून वरील सर्व पदार्थ एकत्र करावे.

एकत्र केलेलं मिश्रण यापैकी फ्लॉवरच्या तुकड्यांना नीट चोळावं व निदान एक तास किंवा जास्त वेळ ठेवावं.

मग दोन चमचे बेसन अथवा कॉर्नफ्लोअर भुरभुरून दोन चमचे तेल घालावं.

गॅस तंदूर किंवा इलेक्ट्रिक ओव्हनमध्ये (१७५ अंश) दहा-बारा मिनिटं भाजून गरम खायला द्यावे.

सोबत कोथिंबीर-पुदिना चटणी द्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.