
फिरनी ( पंजाबी गोड पदार्थ )
साहित्य :
दूध एक लिटर+दीड वाटी
तांदळाची पिठी अर्धी वाटी
साखर तीन वाट्या
बदामाचे काप एक वाटी
तीन-चार चिमूट केशराच्या काड्या
कृती :
दीड वाटी गार दुधात तांदळाची पिठी एकजीव कालवावी व बाजूला ठेवावी.
जाड बुडाच्या पातेल्यात एक लिटर दूध तापत ठेवून उकळी आली की साखर घालावी
साखर विरघळली की ढवळत ढवळत हळू हळू कालवलेलं पीठ घालत जावं.
दूध घट्ट होऊ लागेल. आच अगदी मंद ठेवून न थांबता हलवत राहावं.
केशर घालावं आणि दूध चांगलं दाट होऊन हाताला जाड लागू लागलं की गॅस बंद करावा.
फिरनी मातीच्या छोट्या वाडग्यांमध्ये भरून दिली जाते. देताना वर बदामाचे काप पसरावे.
Leave a Reply