
दुधीभोपळ्याची खीर
साहित्य :
एक लिटर दूध
अर्धा किलो दुधीभोपळा
एक वाटी साखर
तांदळाची पिठी अगर कॉर्नफ्लोअर पाव वाटी
किंचित मीठ
चारोळी
तूप
सात-आठ वेलदोडे
कृती :
दुधीभोपळा किसून, तो तुपावर मऊ होईपर्यंत परतून घ्यावा
चवीला किंचित मीठ टाकून, त्यावर दूध घालून, तो कीस दुधात शिजवावा.
दुधाला उकळी आल्यावर त्याला तांदळाची पिठी अगर कॉर्न-फ्लोअर लावावे
नंतर थोडे शिजवून, खाली उतरवून, त्यात साखर व वेलदोड्याची पूड घालावी आणि चांगले ढवळावे
वर चारोळ्या पसराव्या.
तयार आहे झटपट बनणारा गोड पदार्थ दुधीभोपळ्याची खीर.
Leave a Reply