ढाबे दि दाल

ढाबे दि दाल

साहित्य :

उडदाची डाळ दीड वाटी

हरभरा डाळ पाव वाटी

कांदा एक मोठा

टोमॅटो दोन दोन्ही

एक इंच आलं बारीक चिरून

लसूण सहा-सात पाकळ्या चिरून

सुक्या काश्मिरी मिरच्या तीन-चार

तूप दोन चमचे

मीठ

हळद पाव चमचा

जिरे एक चमचा

कृती :

दोन्ही डाळी हळद थोडं मीठ घालून मऊ शिजवून घ्या.

तूप गरम करून हिंग, जिरे घालावं. आलं-लसूण घालून परतावं. त्यावर सुक्या मिरच्या, चिरलेला कांदा घालून परतावं.

कांदा शिजल्यावर टोमॅटो, मीठ घालून परतावं. टोमॅटो शिजल्यावर तिखट घालून दोन मिनिटं परतावं.

हा तडका शिजलेल्या डाळीवर घालन परत पंधरा-वीस मिनिटं डाळ उकळावी.

वाढताना वरून कोथिंबीर पेरावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.