
पंचरत्न दाल
साहित्य
मुगाची, मसुराची, तुरीची, उडदाची आणि हरभऱ्याची डाळ सर्व एकत्र करून एक वाटी
आलं किसून एक चमचा
हळद अर्धा चमचा
हिरवी मिरची एक
तेल सहा चमचे
जिरे एक चमचा
हिंग चिमूटभर
कांदा एक
टोमॅटो दोन
तिखट एक चमचा
लोणी एक चमचा
मीठ
कृती :
डाळी धुऊन अर्धा तास पाण्यात भिजत घालाव्यात. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावं.
मिश्र डाळ प्रेशर कुकरमध्ये घालून त्यात मीठ, हळद, आलं, चिरलेली हिरवी मिरची घालावी. दीड वाटी पाणी घालावं व शिजत ठेवावं. एक शिट्टी झाली की गॅस बंद करावा.
शिजलेली डाळ कितपत दाट-पातळ आहे बघावं. पातळ वाटल्यास पाणी जरा आटवावं. दाट वाटल्यास थोडं पाणी घालावं.
सहा चमचे तेल गरम करून त्यात जिरे व हिंग घालावं.
चिरलेला कांदा घालून तांबूस लाल परतावा, मग टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतावं. तिखट घालावं.
डाळीवर गरम तडका ओतून वरून चमचाभर लोणी घालावं.
Leave a Reply