
कॉर्न राईस
साहित्य :
एक वाटी जुना तांदूळ
एक वाटी मक्याचे दाणे
अर्धा चमचा आलं पेस्ट
अर्धा चमचा लसूण पेस्ट
मिरचीचे चार-पाच तुकडे
कढीलिंबाची पानं दहा-बारा
एक डावभर तेल
फोडणीचं साहित्य
एक गाजर उभं चिरून
एक भोपळी मिरची उभी चिरून
कोबी लांब लांब चिरलेला अर्धी वाटी
मीठ
काळी मिरीचे दहा- पंधरा दाणे
दालचिनीचे दोन-चार तुकडे
लवंग
तमालपत्र
खोबरं
कोथिंबीर
कृती :
प्रथम तांदूळ धुऊन ठेवावेत.
मक्याचे दाणे उकडून घ्यावेत.
तेलाची फोडणी खमखमीत करून भोपळी मिरची, गाजर, उभा कोबी असं सर्व परतून घेऊन काढून घ्यावं.
परतताना झाकण ठेवू नये. कारण भोपळी मिरचीचा रंग बदलतो.
नंतर दालचिनी, लवंग, तमालपत्र, कढीलिंब, मिरचीचे तुकडे, मक्याचे दाणे, आलं-लसूण पेस्ट टाकून परतून घ्यावं आणि
त्यावर तांदूळ टाकून मऊ मोकळा भात शिजवावा. मीठ घालावं.
भात होत आला की सरतेशेवटी भोपळी मिरची, गाजर कोबी सर्व परतून घेतलेलं घालावं.
वाढताना कोथिंबीर खोबरं घालावं.
Leave a Reply