
चिंचेची चटणी
साहित्य:
पाव किलो चिंचेचा कोळ
साखर एक किलो
मीठ अर्धा चमचा
तिखट पाव चमचा
जिरे पाव चमचा भाजून पूड करून.
कृती :
चिंचेचा कोळ गाळून चोथा काढून टाकावा.
जाड बुडाच्या भांड्यात गाळलेला कोळ, साखर आणि दोन कप पाणी घालावं.
मीठ, तिखट, जिन्याची पूड घालून मंद गॅसवर टोमॅटो सॉस इतपत घट्ट होईपर्यंत शिजवावं.
चटणी गार झाल्यावर बाटलीत भरून ठेवावी.
Leave a Reply