
मिरची स्पेशल भात
साहित्य :
एक वाटी बासमती तांदूळ,
मीठ
कच्चा मसाला:
पाच-सहा लवंग
दालचिनी दोन-चार लहान तुकडे
तमालपत्र
अर्धा चमचा शहाजिरं कुटून
दोन डाव तेल
चार लालभडक काश्मिरी मिरच्या देठा सकट
चार सांडगी मिरची
चार लहान हिरव्या मिरच्या
दोन ढोबळी मिरच्या उभ्या कापून
मिरच्या तळण्यासाठी डावभर तेल
पांढरे स्वच्छ भाजून सोललेले दाणे
पाव वाटी भाजलेले तीळ
फोडणीचं साहित्य
एका लिंबाचा रस
कृती:
तांदूळ एक तासभर धुऊन ठेवावेत. नंतर तेलावर लवंग, दालचिनी, तमालपत्र टाकून खमंग फोडणी करावी.
त्यात तांदूळ परतून घेऊन मोकळा भात करावा. भात शिजत असतानाच शहाजिऱ्याची पूड, तीळ दाणे घालावे.
एक लिंबाचा रस काढून ठेवावा. नंतर तेल तापत ठेवून मंद आचेवर सर्व प्रकारच्या मिरच्या चांगल्या तळून घ्याव्यात.
भात वाढताना ताटात मिरच्याचे प्रकार आकर्षकरीत्या लावावेत.
लिंबाचा रस घालावा.
हा भात चांगला चरमरीत चविष्ट तिखट लागतो.
वास तर खमंग छानच येतो.
Leave a Reply