चिकन तीलवाला

chicken-tilwala-recipe-marathi

chicken-tilwala-recipe-marathi

चिकन तीलवाला

साहित्य :

चिकन एक किलो (आठ-दहा तुकडे)

पांढरे तीळ अर्धी वाटी भाजून

चक्का अर्धी वाटी

मीठ

काळे मीठ अर्धा चमचा

मिरपूड एक चमचा

चाट मसाला अर्धा चमचा

आलं-लसूण वाटण तीन चमचे

क्रीम अर्धी वाटी

तेल तीन चमचे

कृती :

सर्व जिन्नस एकत्र करून चिकनला चोळावेत. दोन तास झाकून ठेवावं.

नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मसाल्यासकट सर्व चिकन घालून एकदा परतून घ्यावं व झाकण ठेवून मंद आचेवर मऊ शिजू द्यावं.

चिकनला चिकटलेला घट्ट रसच राहतो.

गरम फुलक्यांबरोबर गरम वाढावं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.