
चिकन बिर्याणी
साहित्य:
चांगल्या प्रतीचा तांदूळ चार वाट्या
चिकन दीड किलो (दहा-बारा तुकडे करून)
बिर्याणी मसाला तीन-चार चमचे
कांदे आठ-दहा पातळ उभे चिरून कुरकुरीत तळून घेतलेले
दही एक वाटी
आलं-लसूण वाटण तीन चमचे
हिरव्या मिरच्या चार-पाच
दोन लिंबांचा रस
मीठ
गरम मसाला एक चमचा
जिरे दोन चमचे
पुदिन्याची पानं अर्धी वाटी
दालचिनी एक इंच
लवंग पाच सहा
वेलदोडे पाच-सहा
तमालपत्र एक
केशर पाव चमचा
तिखट एक चमचा
तेल अर्धी वाटी
कृती:
बरयाच पाण्यात मीठ, लवंग, दालचिनी, वेलदोडे, तमालपत्र घालून ते उकळू लागलं की त्यात धुतलेले तांदूळ घालून शिजवावं व शीत मऊ झालं की पाणी काढून टाकावं.
निथळलेल्या भातावर दोन चमचे तेल घालून नीट मिसळावं.
केशर थोड्याशा- पाव वाटी दुधात मिसळून ते भातावर घालून मिसळावं. तेव्हाच लिंबाचा रसही घालावा.
चिकन स्वच्छ धुऊन घ्यावं. दह्यात आलं-लसूण, मीठ, तिखट, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला, पुदिना पानं हे सर्व घालून ते चिकनला नीट चोळून तीन तास झाकून ठेवावं.
मोठ्या नॉनस्टिक भांड्यात तेल गरम करून तळलेल्या कांद्यापैकी अर्धा पसरावा, वर मसाल्यासकट चिकन घालून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावं.
शिजलं की त्यात भात घालून नीट मिसळावं व दहा-पंधरा मिनिटं मंद आचेवर शिजू द्यावं.
वाढण्याआधी उरलेला तळलेला कांदा वर पसरावा.
आवडीच्या कुठल्याही रायत्याबरोबर खायला द्यावं.
Leave a Reply