
छोले मसाला
साहित्य :
काबुली छोले दोन वाट्या
आलं एक इंच किसून
मीठ
तेल सहा चमचे
हिरव्या मिरच्या दोन
धनेपूड दोन चमचे
हिंग चिमूटभर
जिरे एक चमचा
तिखट तीन चमचे
आमचूर किंवा अनारदाणा पावडर अर्धा चमचा
कोथिंबीर चिरून अर्धी वाटी
कृती :
छोले धुऊन रात्रभर भिजत घालावेत. सकाळी मीठ आणि तीन-चार वाट्या पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये सात-आठ मिनिटं शिजवावे.
कुकर उघडल्यावर छोले मऊ शिजले नसले तर पुन्हा शिजवून घ्यावे.
पॅनमध्ये तेल गरम करून हिंग, जिरे घालावं. आलं घालावं.
आलं कुरकुरीत झालं की धनेपूड, तिखट, आमचूर घालून मिनिटभर परतावं.
मग छोले घालून जवळ जवळ कोरडे होतील एवढंच पाणी ठेवावं आणि जास्त वाटलं तर आटवून घ्या.
वाढायच्या भांड्यात काढून वरून मिरची, कोथिंबीरीनं सजवावं.
Leave a Reply