
चणा डाळ खिचडी
साहित्य :
चण्याची डाळ एक वाटी धुऊन दोन तास भिजवावी
बासमती तांदूळ एक वाटी
जिरे एक चमचा
तेल अर्धी वाटी,
दालचिनी एक इंच
लवंगा चार-पाच
काळी मिरी चार-पाच
तमालपत्र एक
तिखट पाव चमचा
मीठ
कृती :
तांदूळ धुऊन बाजूला ठेवावे.
जाड बुडाच्या भांड्यांत तेल गरम करून त्यात जिरे, दालचिनी, लवंगा, मिरी, तमालपत्र घालून जरा परतावं.
मग डाळ निथळून घ्यावी. निथळलेली डाळ व तांदूळ घालून पाणी न घालता तीन-चार मिनिटं परतावं.
चार वाट्या पाणी व तिखट-मीठ घालावं.
पाण्याला उकळी आली, की झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावी.
Leave a Reply